Rare Blood Group : भारतात आढळला EMM Negative नावाचा दुर्मिळ रक्तगट
गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ रक्तगट असणारी देशातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तींना रक्तदानही करता येत नाही किंवा इतरांचे रक्तही घेता येत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाधारणपणे आपल्याला चार रक्तगट माहित असतात. यामध्ये ए, बी, ओ आणि एबी असे चार रक्तगट सर्वांनाच परिचयाचे आहेत. मात्र, भारतातील डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट (Rare Blood Group) आढळून आला आहे.
गुजरातमध्ये ही दुर्मिळ रक्तगट असलेली व्यक्ती आढळली आहे. वय वर्ष 65 असलेल्या या व्यक्तीला हृदयविकाराचा आजार आहे.
मानवी शरीरात चार रक्तगट असतात. त्याशिवाय, शरीरात ए, बी, ओ, आएच आणि Duffy सारख्या 42 प्रकार असतात. त्याशिवाय 375 अॅण्टीजेन असतात. यामध्ये EMM चे प्रमाण अधिक असतात. EMM अॅण्टीजेन नैसर्गिकपणे शरीरात विकसित होतात. मात्र, पुरेशा प्रमाणात EMM नसल्याने त्यांना EMM निगेटीव्ह असे म्हटले जाते.
मात्र, जगातील फक्त 10 जणांच्या शरीरात EMM चे प्रमाण अधिक नसल्याचे समोर आले आहे. EMM चे प्रमाण कमी असल्याने हे इतरांपेक्षा वेगळ्या व्यक्ती आहेत. हा दुर्मिळ रक्तगट असल्याने या व्यक्ती इतरांना रक्तदान करू शकत नाही, अथवा त्यांना इतर रक्तगटांच्या व्यक्ती रक्त देऊ शकत नाही.
गुजरातमधील राजकोट येथे 65 वर्षीय व्यक्तीमध्ये हा दुर्मिळ रक्तगट आढळला आहे. समर्पण रक्तदान केंद्रातील डॉक्टर सन्मुख जोशी यांनी सांगितले की, या 65 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले.
या शस्त्रक्रियेसाठी त्यांना रक्ताची आवश्यकता होती. मात्र, अहमदाबाद येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्तगटाचे उपलब्ध झाले नाही. त्यानंतर सुरत येथील रक्तपेढीत त्यांच्या रक्ताचे नमुने पाठवण्यात आले असल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली.