Kangana Ranaut : बायोपिक 'क्विन' कंगना; चित्रपटांनी जिंकली प्रेक्षकांची मनं
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. कंगनानं काही बायोपिक्समध्ये काम केलं आहे. जाणून घेऊयात तिच्या बायोपिक्सबद्दल...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App25 जानेवारी 2019 रोजी कंगनाचा मणिकर्णिका: क्विन ऑफ झाँसी चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा दर्शवण्यात आली आहे.
'मणिकर्णिका: क्विन ऑफ झाँसी' या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटामध्ये कंगनासोबतच अतुल कुलकर्णी,जीशु सेनगुप्ता या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.
10 नोव्हेंबर 2019 रोजी थलाईवी हा कंगनाचा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये कंगनानं जयललिता यांची भूमिका साकारली.
थलाईवी या चित्रपटामध्ये कंगनासोबतच अरविंद स्वामी, भाग्यश्री यांनी प्रमुख भूमिका साकारली.
लवकरच कंगनाचा इमरजंसी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
इमरजंसी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे.