Health Tips : अंड्यासोबत चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नये ; याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो...
संडे असो वा मंडे रोज खा अंडे’ अशी म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. कारण एका अंड्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. तसेच पृथ्वीवरील सर्वात पौष्टिक पदार्थांमध्ये अंड्यांची गणना केली जाते. (Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण, जिथे भरपूर फायदा असतो तिथे नुकसान होण्याचा धोका आपल्याला नाकारता येत नाही. अंडी शरीरासाठी फायदेशीर तेव्हाच होईल जेव्हा त्याचं योग्य पध्दतीने सेवन केले जाईल.(Photo Credit : Unsplash)
म्हणूनच अंडी खातांना ‘या’ चूका अजिबात करू नका, अन्यथा तुम्हला त्याच्या दुष्परिणामांना समोरे जावे लागेल. जाणून घ्या या महत्वपूर्ण गोष्टी. (Photo Credit : Unsplash)
दुधासोबत अंडी खावीत का? :अनेकांना हा प्रश्न पडतो की दुधासोबत अंडी खावी का? असे मानले जाते की अंडी कधीही दूध आणि पनीर या पदार्थांसोबत खाऊ नयेत. याशिवाय कलिंगड यासारख्या काही फळांसोबतही अंडी खाऊ नयेत.(Photo Credit : Unsplash)
चहा सोबत अंड्याचे सेवन करावे का? : हे असे कॉम्बिनेशन आहे ज्याचा जगभरातील अनेक लोक आनंद घेतात. खरं तर या कॉम्बिनेशनमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. तसेच तुमच्या शरीराला गंभीर हानी पोहचू शकते. शिवाय बद्धकोष्ठतेमुळे मुळव्याधही होऊ शकतो.(Photo Credit : Unsplash)
सोया मिल्क आणि अंड यांचे सेवन करावे का? : सोया मिल्कसोबत अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरातील प्रथिनांचे शोषण रोखले जाऊ शकते. अर्थात, जर तुम्ही प्रोटीन मिळवण्याच्या उद्देशाने अंडी खात असाल तर तुम्हाला फारसा फायदा होण्याची शक्यता कमी आहे.(Photo Credit : Unsplash)
साखर आणि अंड : जर तुम्ही साखर घालून अंडी शिजवलीत म्हणजेच अंड्याची एखादी रेसिपी बनवताना साखरेचा वापर केला किंवा अंड खाताना एखादा गोड पदार्थ खाल्ला तर, दोन्हीमधून निघणारी अमिनो अॅसिड्स मानवी शरिरासाठी विषारी ठरू शकतात. तसेच शरीरात रक्ताच्या गाठी (blood clot) तयार होऊ शकतात.(Photo Credit : Unsplash)
तज्ज्ञांच्या मते कोणत्याही खाण्यापिण्याच्या गोष्टींचे आरोग्याला फायदे तेव्हाच जास्त प्रमाणात मिळतात जेव्हा ते योग्य गोष्टींसोबत सेवन केले जातात.(Photo Credit : Unsplash)
अंडी हे एक सुपरफूड आहे जे प्रत्येकाला खायला आवडते. साहजिकच, अंड्यांचा आहारात अनेक प्रकारे समावेश केला जातो आणि प्रत्येक स्वरूपात ते आरोग्यासाठी फायदेशीरच ठरते. त्यामुळे त्याचे सेवन योग्य पद्धतीने करायला हवे. (Photo Credit : Unsplash)
अंड्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे ते लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही खाऊ शकतो. जर आपण अंड्याच्या ताकदीबद्दल बोललो तर ते प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स यासारख्या विविध पोषक तत्वांचे भांडार आहे.(Photo Credit : Unsplash)