PHOTO: भूमीचा क्लासी लूक; ब्लॅक ड्रेसमध्ये वेधलं लक्ष!

अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हिने बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भूमी ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

भूमीनं ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
भूमी यश कटारियाला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. पण भूमीनं याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही.
2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा या चित्रपटामधून भूमीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
टॉयलेट: एक प्रेम कथा,बधाई दो, पती पत्नी और वो आणि गोविंदा नाम मेरा या चित्रपटांमध्ये भूमीनं काम केलं आहे.
भूमी तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
भूमी ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. ती विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इन्स्टाग्रामवर भूमीला 7.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.
भूमीने नुकताच एक लूक शेअर केलाय ज्यात ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
यासोबत तिने मोतीचा सेट गळ्यात घातला आहे.
अभिनेत्रीने नुकतीच पोस्ट करून माहिती दिली आहे की तिला 1 आठवड्यापूर्वी डेंग्यू झाला होता.