Dates Benefits:भिजवलेले खजूर नियमित खाल्याने बद्धकोष्ठतेपासून ते रक्त कमी होण्यापर्यंत,सर्व आजार होतील दूर
या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणे हे सर्वांसाठीच एक मोठे आव्हान आहे. पण प्रयत्न केल्याने काहीही अशक्य नाही असे म्हटले जाते. काही लोक असे असतात जे स्वतःला फिट ठेवण्यासाठी नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मात्र खजुराचा आहारात समावेश केल्यास बद्धकोष्ठतेपासून रक्ताच्या कमतरतेपर्यंत शरीरातील सर्व लहान-मोठ्या आजारांपासून मुक्ती मिळेल. कारण ड्रायफ्रूट्स पौष्टिकतेने समृद्ध असतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदररोज सकाळी सर्वप्रथम दोन ते तीन खजूर खावे. दुपारचा नाश्ता म्हणूनही खाल्ल्यास खजूराची चव उत्तम लागते. कारण फायबरयुक्त हे फळ खाल्ल्याने अनेक आजारांशी लढण्यास मदत होते. तसेच साखरेची लालसा दूर करण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे.
खजूर पाण्यात भिजवल्याने त्यातील टॅनिन दूर होते. यानंतर त्यातून पोषक द्रव्ये सहज शोषून घेणेही आपल्याला सोपे जाते. भिजवलेले खजूर खाल्ल्याने ते पचायलाही सोपे होतात. खजूरची चव चाखायची असेल आणि त्यापासून पोषक तत्वे मिळवायची असतील तर रात्री किंवा खाण्यापूर्वी ८-१० तास भिजत ठेवा. खजूरमध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, एम असे अनेक पोषक घटक असतात.
रोज खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. तसेच वाढलेले कोलेस्ट्रॉलही कमी करण्यास मदत करेल.
नियमित भिजवलेले खजूर खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहील.त्याचबरोबर हाडे देखील मजबूत राहतील.
खजूराचा आपल्या आहारात समावेश केल्याने मेंदूच्या कार्याला गती मिळेल.
थकवा आणि अशक्तपणापासून मुक्ती मिळवण्यासाठीही भिजवलेले खजूर हा एक चांगला उपाय असू शकतो .
मूळव्याधाची समस्या दूर होण्यासाठीही नियमित खजूर खाल्याने मदत होते. तसेच त्वचा आणि केसांसाठीही हे खूप फायदेशीर आहे.
शारीरिक शक्ती आणि स्टॅमिना वाढविण्यासाठीही खजूर उपयुक्त ठरतात आणि हृदयही निरोगी ठेवते. त्यामुळे आपल्या नियमित आहारात खजुराचा समावेश करणे आवश्यक आहे .