Peanut Butter Benefits : रोज पीनट बटर खाल्ल्याने शरीराला मिळतात 'हे' 7 आश्चर्यकारक फायदे; अनेक रोगांवर गुणकारी
पीनट बटरमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन-बी3, व्हिटॅमिन-बी6, फोलेट, मॅग्नेशियम, कॉपर, मॅंगनीज, व्हिटॅमिन-बी5, लोह, पोटॅशियम, झिंक आणि सेलेनियम आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीनट बटरमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. जे हृदयरोगाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते.
हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पीनट बटरचा समावेश करू शकता. पीनट बटरमध्ये लोह आणि कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. आणि हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका खूप कमी होतो.
पीनट बटर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका देखील कमी होतो.
पीनट बटरमध्ये भरपूर कॅलरीज, प्रोटीन आणि फायबर आढळतात. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. याच्या सेवनाने भूक लवकर लागत नाही. हे तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ईचे सेवन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण व्हिटॅमिन ई डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या टाळू शकते. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही पीनट बटरचे सेवन करू शकता.
पीनट बटरमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड आढळते. पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. पीनट बटरच्या सेवनाने हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
ज्या लोकांना अनेकदा अशक्तपणा आणि थकवा जाणवतो त्यांनी दररोज पीनट बटरचे सेवन ब्रेकफास्टमध्ये करावे. कारण पीनट बटरमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात. त्यामुळे त्याचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.