Health Tips: रिकाम्या पोटी ज्युस घेणे आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या
योग्यवेळी फळांचा रस घेतला तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. पण चुकीच्या वेळी शरीरात रस गेला तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी संभावतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक फळामध्ये काही ना काही ॲसिड असतात.
सकाळी उठल्यानंतर आपले पोट रिकामी असते. त्यामुळे हे ॲसिड काही जणांच्या शरीरात रिॲक्ट करु लागतात.
त्यामुळे अशावेळी खूप जणांना ॲसिडीटीचा त्रास होऊ लागते.
अनेक जण फळ आणि गाजर-बीट असा मिक्स ज्युस करुन पितात. त्यामुळे यातील काही घटक तुमचे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करत असतात.
जर तुम्ही उपाशी पोटी असे रस घेतला तर त्यामुळे काही काळासाठी तुम्हाला डोके जड झाल्यासारखे वाटेल.
फळांचे रस हे पोटाच्या आरोग्यासाठी कितीही चांगले असले तरी देखील त्यांचे सेवन चुकीच्या वेळी झाले तर त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो.
खूप जणांच्या पोटात असा रस घेतल्यानंतर जळजळ होऊ लागते. पण पोट साफ होत नाही अशा तक्रारीदेखील होतात.
ज्यांना पोटाचे विकार अगदी पटकन होतात अशांसाठीही उपाशी पोटी ज्युस पिणे चांगले नाही. अशा लोकांना ज्युस घेतल्यानंतर पोटदुखीचा त्रास होतो. खूप जणांचे ओटीपोट ही वेदना होतात.
डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार, उपाशी पोटी फळांचा ज्यूस घेणे चांगले आहे.