हळदीच्या अतीवापराने 'या' गंभीर आजरांची समस्या उद्भवू शकते....

हळद अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते. आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी ही खूप प्रभावी आहे. तणाव आणि जळजळ या सारख्या समस्या सूर करण्यासाठी हळद ही सर्वात प्रभावी मानली जाते.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात हळद ही सहज मिळेते. हळदीचा वापर जवळपास प्रयेक घरात विविध पदार्थामध्ये केला जातो. (Photo Credit : Pixabay)

हळद ही अनेक आजारांवर उपायकारक ठरते जसे की, सांधेदुखी कमी करण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे हळद. (Photo Credit : Pixabay)
या व्यतिरिक्त हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. प्रथिने, कॅल्शियम, फायबर, लोह आणि जस्त यांसारखे अनेक पोषक घटक यामध्ये आढळतात, परंतु तुम्हाला माहित आहे का अन्नामध्ये हळदीचा जास्त वापर केल्यानेही अनेक तोटे देखील होतात. जाणून घ्या काय आहेत ते तोटे. (Photo Credit : Pixabay)
हळद पोटासाठीही खूप हानिकारक मानली जाते. जर तुम्ही तुमच्या जेवणात हळद मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर त्यामुळे पोटदुखी होऊ शकते. (Photo Credit : Pixabay)
किडनी संबंधी समस्या असलेल्या रुग्णांसाठी हळद अत्यंत हानिकारक ठरू शकते. हळदीत असलेले घटक मुतखडा होण्याचा धोका वाढवू शकता, त्यामुळे मुतखड्याच्या समस्या असलेल्या रुग्णांनी हळदीचे सेवन कमीत कमी करावे किंवा वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(Photo Credit : Pixabay)
कधीकधी हळदीमुळे अॅलर्जी होऊ शकते. काहींना त्वचेवर हळद लावल्यानंतर पुरळ उठणे, पुरळ येणे, खाज येणे यासारख्या समस्या होऊ शकता. (Photo Credit : Pixabay)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी हळद हानिकारक ठरू शकते. कारण हळदीचे सेवन केल्यास मधुमेही रुग्णांचे रक्त हे घट्ट होऊ शकते. मधुमेही रुग्ण ते पातळ करण्यासाठी गोळ्या घेत असतात.(Photo Credit : Pixabay)
हळद ही रक्त पातळ करण्याचेही काम करत असते. जास्त रक्त पातळ झाल्यामुळे गंभीर आजार होऊ शकता.(Photo Credit : Pixabay)
त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी हळद खाणे टाळावे. तसेच नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास अशा लोकांनी जास्त हळद खाऊ नये. (Photo Credit : Pixabay)