Stale Food : थांबा! शिळे अन्न खाताय? तर याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून घ्या!
महिलांना शिळे अन्न खाण्याची खुप सवय असते. रात्रीचा शिळा भात, खिचडी या सारखे पदार्थ महिला आवडीने खातात (Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही ही अति प्रमाणात शिळे अन्न खात असाल तर वेळीच त्याचे प्रमाण कमी करा.याचे तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात (Photo Credit : Unsplash)
कुटुंबातील सदस्यांना रुचकर जेवण खाऊ घालताना बहुतांश वेळा महिला वर्गाकडून उरलेले, शिळे अन्न स्वतः खाल्ले जाते. परंतु, यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची माहिती समोर येतेय. (Photo Credit : Unsplash)
उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होत असल्याने केवळ ताजे आणि पौष्टिक अन्न खावे, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जातो.(Photo Credit : Unsplash)
घरातील सदस्यांच्या आवडी-निवडी जोपासताना निरनिराळे खाद्यपदार्थ बनवून खाऊ घालण्यात गृहिणींची दमछाक होत असते.पण, एरवी प्रत्येकाची आवड जपणाऱ्या महिलांकडून स्वत:च्या आहाराकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असते.(Photo Credit : Unsplash)
शिल्लक राहिलेले अन्न फेकले जाऊ नये किंवा त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जवळपास सर्वच महिला दररोज शिळे अन्न खातात.(Photo Credit : Unsplash)
शिळे व पौष्टिक नसलेले अन्न खाल्ल्याने आरोग्यावर सौम्य ते गंभीर परिणाम होतो. (Photo Credit : Unsplash)
जळजळ होण्यापासून तर वात-पित्ताचे विकार, पोटाचे आजार यांसह विषबाधा होण्याची भीती असते.(Photo Credit : Unsplash)
शिळे अन्न खाल्ल्याने आळसही वाढू शकतो. शरीराला हवे असलेले पोषक तत्त्व नष्ट झालेले असल्याने, असे अन्न आरोग्यास अपायकारक ठरू शकते.(Photo Credit : Unsplash)
शक्य असेल तेवढ्या कमी प्रमाणात शिळे अन्न खावे. तसेच महिला वर्गाने शिळे अन्न उरणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. (Photo Credit : Unsplash)