Winter Tips : अशी घ्या थंडीच्या दिवसात तुमच्या शरीराची काळजी...
थंडीची चाहूल जाणवू लागली आहे. या दिवसात प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे गरजेचे असते. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घेणे अवघड वाटू लागते. त्वचा हा आपल्या शरीराचा एकमेव भाग आहे जो थंडीच्या संपर्कात येतो. (Photo Credit : Pixabay)
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. त्वचा हा आपल्या शरीराचा एकमेव भाग आहे जो थंडीच्या संपर्कात येतो. यामुळेच थंडीच्या दिवसात आपल्या त्वचेला विविध समस्यांना सामोरे जावे लागते.(Photo Credit : Pixabay)
आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण महागडी उत्पादने वापरतो, परंतु तरीही त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही उलट काही उत्पादनांमुळे त्वचेवर दुष्परिणाम होऊ लागतात. (Photo Credit : Pixabay)
काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता.(Photo Credit : Pixabay)
जर तुम्हालाही थंडीच्या काळात त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू लागल्या तर रात्री हा उपाय करून पाहा ज्यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.(Photo Credit : Pixabay)
थंडीच्या दिवसात फक्त खोबरेल तेल आणि मोहरीचे तेल लावून त्वचेचा कोरडेपणा दूर केला जाऊ शकतो.(Photo Credit : Pixabay)
हिवाळ्यात तेल वापरण्यासोबतच मॉइश्चरायझर लावणे फायदेशीर ठरेल. याच्या मदतीने तुम्ही थंडीच्या दिवसात कोरड्या त्वचेच्या समस्येपासून दूर राहू शकता.(Photo Credit : Pixabay)
गुलाबपाणी आणि कोरफडीपासून बनवलेली ही खास रेसिपी तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गुलाब पाण्याच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करणे तुमच्यासाठी सोपे होऊ शकते. (Photo Credit : Pixabay)
हिवाळ्याला आरोग्यदायी ऋतू म्हणतात. या हंगामात पिकवलेल्या भाज्या ताज्या आणि पोषक असतात. त्यामुळे या हंगामात जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचे सेवन करावे.(Photo Credit : Pixabay)