Microwave: 'हे' पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये करु नका गरम, होऊ शकतो आरोग्यावर परिणाम

भात - भातामध्ये बॅसिलस सेरेयस नावाचा जीवाणू आढळतो, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होते. तांदूळ शिजल्यानंतरही हे जीवाणू टिकून राहतात आणि तांदूळ खोलीच्या तापमानावर जास्त काळ ठेवल्यास ते अनेक पटीने वाढतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यामुळेच भात लवकर थंड करून फ्रिजमध्ये ठेवावा आणि पुन्हा खाण्यापूर्वी गॅसवर गरम करावा. मायक्रोवेव्हमध्ये भात गरम केल्याने बॅसिलस सेरेयस बॅक्टेरियावर परिणाम होत नाही.

अंडी - उकडलेले अंडी मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम केल्याने त्यामधून कॅसिनोजेनिक टॉक्सिन्स बाहेर पडतात, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात.
कॉफी - मायक्रोवेव्हमध्ये कॉफी पुन्हा गरम करणे देखील टाळावे. कारण कॉफी थंड झाल्यावर आम्लयुक्त होते.
जेव्हा आपण थंड झालेली कॉफी पुन्हा गरम करतो तेव्हा तिची चव कमी होऊ शकते. कॉफी पुन्हा गरम करण्याऐवजी थर्मो फ्लास्कमध्ये साठवा आणि हवी तेव्हा प्या.
मासे - मायक्रोवेव्ह ओलावा शोषून घेतात, याचा अर्थ त्यात मासे गरम केल्याने त्याचा सर्व मऊपणा काढून घेतला जाऊ शकतो.
चिकन - याशिवाय चिकनही देखील मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये.