Web Series: 'या' वेब सीरिजच्या निर्मितीसाठी कोट्यवधींचा खर्च, जाणून घ्या बजेटबद्दल
गेल्या काही वर्षांत, ओटीटीवरील (OTT) चित्रपट आणि वेब सीरिजची (Web Series) लोकप्रियता वाढली आहे. काही वेब सीरिजचे (Web Series) बजेट कमी असते तर काहींचे जास्त. ओटीटीवरील बिग बजेट वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेड इन हेवन या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या लोकप्रिय वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या लोकप्रिय आणि हिट सीरिजच्या पहिल्या सीझनचे बजेट 100 कोटी रुपये होते.
पहिल्या सीझनमध्ये मोठे सेट होती. या सीरिजमध्ये शोभिता धुलिपाला आणि जिम सरभ यांच्यासोबत अर्जुन माथूर, कल्की केकला, शशांक अरोरा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.
मनोज बाजपेयी यांच्या 'द फॅमिली मॅन' या सीरिजचे 2 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. तिसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
'द फॅमिली मॅन' या सीरिजच्या दोन्ही सीझनची निर्मिती 50-50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'सेक्रेड गेम' या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
'सेक्रेड गेम' या सीरिजचा पहिला सीझन 40 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता, तर पहिल्या सीझनच्या उत्कृष्ट यशानंतर, निर्मात्यांनी दुसरा सीझन ₹ 100 कोटींच्या बजेटमध्ये बनवला.
मिर्झापूर या वेब सीरिजला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. कलेन भैया, गुड्डू, बबलू, गोलू गुप्ता आणि मुन्ना भैया या मिर्झापूर वेब सीरिजमधील भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक वाट पाहत आहे.
मिर्झापूर या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनची निर्मिती 60 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली. मिर्झापूर सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा हे कलाकार दिसले होते.