Benefits Of Orange Juice : संत्र्याचा रस 'या' आजारांवर फायदेशीर; हिवाळ्यात संत्र्याचा रस पिण्याची योग्य वेळ कोणती?

संत्र्याचा रस पिणे जेवढे चवदार आहे तेवढेच ते आरोग्यदायीही आहे. संत्र्याच्या रसामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. (Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
संत्र्याचा रसाचे सेवन शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतो. हिवाळ्यात संत्र्याचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत पण, या रसाचे योग्य वेळी सेवन केल्यावरच फायदा होईल. चला जाणून घेऊया हिवाळ्यात संत्र्याचा रस कधी प्यावा आणि त्याचे काय फायदे आहेत(Photo Credit : Unsplash)

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे शरीर लवकर आजारांना बळी पडते. अशा परिस्थितीत दररोज एक ग्लास संत्र्याचा रस प्यावा. (Photo Credit : Unsplash)
संत्र्याचा रस रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. संत्र्याचा रस रोज प्यायल्याने सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या कमी होतात.(Photo Credit : Unsplash)
हिवाळ्यात कोलेस्ट्रॉलची समस्या वाढण्याचा धोका असतो. अशा स्थितीत संत्र्याच्या रसाचे सेवन केल्यास उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका कमी करू शकते.(Photo Credit : Unsplash)
हिवाळ्यात आपण पाणी खूप कमी पितो यामुळे, डिहायड्रेशनचा धोका असतो, तसेच अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत संत्र्याचा ज्यूस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि ऊर्जाही टिकून राहते.(Photo Credit : Unsplash)
संत्र्याचा रस हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतो. हे प्यायल्याने त्वचा चमकदार होते. संत्र्याच्या रसामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात आणि मुरुम, डाग आणि सुरकुत्या यापासून मुक्त होतात.(Photo Credit : Unsplash)
हिवाळ्यात डोळ्यांच्या आरोग्यासाठी संत्र्याचा रस फायदेशीर मानला जातो. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. याचे नियमित सेवन केल्याने दृष्टी सुधारते आणि डोळ्यांची प्रत्येक समस्या दूर होऊ शकते.(Photo Credit : Unsplash)
हिवाळ्यात संत्र्याचा रस फक्त सकाळी किंवा दुपारी प्यावा. अशा वेळी हा रस प्यायल्याने खूप फायदा होतो. लक्षात ठेवा संत्र्याचा रस कधीही रिकाम्या पोटी किंवा रात्री पिऊनये. अन्यथा अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.(Photo Credit : Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Unsplash)