Diabetic Child Tips : मुलांच्या आहाराची 'अशी' घ्या काळजी, मधुमेही मुलांचंही जेवण चविष्ट बनवा, 'या' टीप्स फॉलो करा

काही सोप्या मार्गांबद्दल जाणून घ्या ज्याद्वारे तुम्ही मधुमेह असलेल्या मुलांनाही चविष्ट आहार देता येईल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सहा महिने ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना टाइप 1 मधुमेहाची समस्या होऊ शकते. दरम्यान, लहान मुलांमध्ये टाइप 1 मधुमेहाचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो.

तसेच, मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे टाईप 2 मधुमेहाच्या प्रकरणांमध्येही वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
मधुमेहाचा त्रास असलेल्या मुलांना गोड पेयांपासून दूर ठेवावं. ज्यूस, लस्सी आणि कार्बोनेटेड पेयं टाळा. तसेच, कुकीज आणि नट्ससह तळलेलं अन्नपदार्थ दूर ठेवा. यामुळे शरीरात ट्रान्सफॅटचं प्रमाण वाढतं. या खाद्यपदार्थांमुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
डॉक्टरांच्या मते, तुमच्या मुलाला मधुमेह असेल तर, बाहेरचे अन्नपदार्थ देण्यापेक्षा तुम्ही घरी तयार केलेले अन्न देण्यास प्राधान्य द्या.
बाहेरचे अन्नपदार्थ शक्यतो टाळा. फास्टफूडमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. यामुळे वजन वाढण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते. त्यामुळे घरात बनवलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांना अधिक प्राधान्य दिलं पाहिजे.
मधुमेही मुलांसाठी स्टार्चविरहित भाज्या, प्रथिने आणि कर्बोदके हे घटक आवश्यक असतात. ते म्हणतात की मुलाला पौष्टिक आणि सकस आहार देण्याचा हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे.
मधुमेही मुलांना नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रथिनयुक्त भाज्या आणि कॉटेज चीजसह बनवलेला बेसन चिला रोल यांचा समावेश करू शकता. बीन्स आणि गाजरांसह इतर भाज्या मिसळूनही पोहे बनवल्यास तोही एक चांगला पर्याय ठरेल.
दुपारच्या जेवणासाठी तुम्ही एक वाटी सॅलड, एक वाटी रायता किंवा कोणतीही आवडीची भाजी देऊ शकता. सोबत एक वाटी डाळ आणि भातही मुलांना जेवणासाठी देता येईल.
रात्रीच्या जेवणात मुलांना पालक किंवा डाळ चपातीसोबत देता येईल. याशिवाय कोशिंबीर किंवा रायताही देता येईल.