PHOTO: 'या' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात!
तुम्हालाही हाता-पायांना वारंवार मुंग्या (Tingling) येतात का? वारंवार मुंग्या येण्याच्या संवेदनांचा तुम्हालाही त्रास होतो का? जर तुमचं उत्तर होय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरंतर, हात-पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला वारंवार मुंग्या येण्याची समस्या तुमच्या शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होते. विशिष्ट प्रकारच्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे न्यूरॉन्सच्या क्रियाकलापांवर परिणाम होतो. त्यामुळे मज्जातंतूंच्या कार्यावरही परिणाम होतो. अशा वेळी, कोणत्या व्हिटॅमिनच्या (Vitamin) कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात? आणि हे टाळण्यासाठी नेमके उपाय कोणते करावेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी12 (Vitamin B12) ची कमतरता असते तेव्हा अनेक न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू लागतात.
त्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, थकवा येणे, नैराश्य, पायांमध्ये पॅरेस्थेसिया आणि स्नायूंची जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
ही समस्या मुख्यतः मज्जातंतूशी संबंधित आहे. ज्यामुळे स्नायू आणि नसा कमकुवत होऊ शकतात. यामुळे नसांमध्ये मुंग्या येऊ लागतात.
अनेक अहवालांमध्ये असे समोर आले आहे की, हात आणि पायांना मुंग्या या केवळ व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळेच नाही तर इतर जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील येऊ शकतात.
तुम्ही जर योग्य आहार घेतला नसेल तर शरीरात जीवनसत्वाची कमतरता जाणवते. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या आतड्यांमध्ये जीवनसत्त्वं नीट पोहोचत नाहीत. त्यांच्यात या जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते.
शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, मांस, मासे आणि अंडी खा. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूध, चीज आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने देखील दूर केली जाऊ शकते.
आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करून व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून काढता येते. भरड धान्य खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी12 देखील पुरेशा प्रमाणात मिळते.
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
all photo credit: https://unsplash.com/s/photos/vitamin