Tamannaah Bhatia Wedding: बॉलीवुड कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा लवकरच लग्न करणार!

बॉलिवूड कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी नुकतेच त्यांचे नाते अधिकृत केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दोघेही अनेकदा हात हातात घेतलेले दिसतात. आता विजय आणि तमन्ना त्यांच्या नात्याला पुढच्या पातळीवर म्हणजेच लग्नापर्यंत नेण्याचा विचार करत आहेत.

अलीकडच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की हे जोडपे लग्नाबाबत गंभीर होत आहेत.
सूत्रांच्या हवाल्याने या जोडप्याबद्दल सांगितले जात आहे की, तमन्नाचे पालक विजयसोबत लग्न करण्यासाठी तिच्यावर दबाव आणत आहेत.
तमन्ना आणि विजय या दोघांचे पालक एकमेकांना भेटले आहेत. दोघांनी लवकरच लग्न करावे अशीही चाहत्यांची इच्छा आहे.
एका मुलाखतीत लग्नाविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली होती, 'मला वाटतं की जेव्हा तुम्हाला लग्न करायचं असेल तेव्हा लग्न करावं. लग्न ही मोठी जबाबदारी आहे, ती पार्टी नाही.
दुसरीकडे, तमन्नाच्या आगामी चित्रपटांबद्दल बो लायचे झाल्यास, अभिनेत्री लवकरच वांद्रे नावाच्या मल्याळम चित्रपटात दिसणार आहे.