Pizza Dangerous Side Effects : तुम्हालाही पिझ्झा खायला आवडते का? 'या' गंभीर आजारांचा धोका वाढतो
आजकाल लोकांमध्ये फास्ट फूड खाण्याची क्रेझ खुप वाढत असल्याचे पाहायला मिळतेय. पिझ्झा, बर्गर, मोमोज असे अनेक पदार्थ लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. पिझ्झा (pizza) तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑर्डर केला की अवघ्या अर्ध्या तासात घरी येणारा हा पिझ्झा सर्वजण आवडीने खातात. तो चविष्ट तर असतचो, पण तो सतत खाल्ल्यास काही दुष्परिणामही दिसून येतात. (Photo Credit : pixabay)
आपल्या आरोग्याचेही मोठे नुकसान होऊ शकते. तुम्हालाही पिझ्झा खूप आवडत असेल तर त्याच्या दुष्परिणामांबद्दलही जाणून घ्या.(Photo Credit : pixabay)
तुम्हाला जो पिझ्झा खायला खूप आवडतो, तो बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. मैदा आपल्या आरोग्यासाठी फार नुकसानकारक असतो. हे तर सर्वांनाच माहीत आहे. (Photo Credit : pixabay)
अशा परिस्थितीत पिझ्झा देखील आपल्यासाठी खूप हानिकारक ठरतो. त्यामध्ये जीवनसत्त्वे, फायबरसारख्या पोषक तत्वांची कमतरता असते, त्यामुळे पिझ्झा खाल्ल्याने वजन वाढू शकते.(Photo Credit : pixabay)
पिझ्झा चविष्ट व्हावा यासाठी त्यात भरपूर चीज वापरले जाते, पण त्यामुळे आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते. अशा परिस्थितीत पिझ्झा सतत खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही वाढतो. त्यामुळे पिझ्झा जेवढा कमी खाल तेवढेच ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.(Photo Credit : pixabay)
सतत खूप पिझ्झा खाल्ल्याने हायपरटेन्शनचा त्रासदेखील होऊ शकतो. खरंतर, सतत पिझ्झा खाल्ला तर आपल्या शरीरातील सोडिअमचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.(Photo Credit : pixabay)
पिझ्झाचे सतत सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळीही बिघडू शकते. पिझ्झाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत हे खूप धोकादायक ठरू शकते.(Photo Credit : pixabay)
पिझ्झा बनवताना त्यामध्ये मैदा, चीज, प्रिझर्व्हेटिव्ह यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे या पदार्थांच्या अतिसेवनामुळे तुम्हाला ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो. जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल, तर पिझ्झा, बर्गर असे मैदायुक्त पदार्थ न खाणेच चांगले ठरते.(Photo Credit : pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pixabay)