Health Tips : दररोज दही खाणं आरोग्यासाठी हनिकारक? तज्ज्ञ काय सांगतात?
दह्यामध्ये खनिजे आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. अनेक जण आवडीने दही खातात. पण, दररोज दही खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतज्ज्ञांच्या मते, दररोज ठराविक प्रमाणात दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मर्यादित प्रमाण दही खाणं चांगले आहे. (Image Source : istock)
रात्री दही खाणे टाळा. रात्री दही खाल्ल्याने त्यामुळे कफ होण्याची शक्यता असते. दररोज दही खाण्याचे फायदे जाणून घ्या. (Image Source : istock)
दही खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रोटीन आणि अमिनो अॅसिड मुबलक प्रमाणात मिळतात. हे शरीर आणि त्वचेप्रमाणे केसांच्या आरोग्यासाठीही गरजेचं आहे. (Image Source : istock)
दही खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅस, पोटातील उष्णता यासारख्या समस्या दूर होतात. (Image Source : istock)
शरीरातील हाडांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे लहान आणि कमकुवत होतात. दही खाल्ल्याने शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होऊ शकतो. दह्यामध्ये कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते. (Image Source : istock)
व्हिटॅमिन बी 12 शरीरातील नसा, मेंदू आणि रक्तासाठी आवश्यक आहे. हे जीवनसत्व फार कमी पदार्थांमध्ये आढळते. सध्या अनेकांना याची कमतरता जाणवते. दही दुधापासून बनवले जात असल्याने त्यापासून थोड्या प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 मिळते. (Image Source : istock)
खूप थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर दही खावे. दही खाल्ल्याने ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो. (Image Source : istock)
अशाप्रकारे दररोज मर्यादित प्रमाणात दही खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. (Image Source : istock)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image Source : istock)