Shani Dev : शनी मार्गी होण्यापूर्वी 'या' गोष्टी अवश्य करा, शनिदेवाच्या कृपेने सुख-समृद्धी, धनलाभाची शक्यता
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता मानले जाते जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनीची शुभ स्थिती लाभदायक ठरते, मात्र अशुभ स्थितीतील शनि तुम्हाला आयुष्यभर त्रास देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनी सध्या कुंभ राशीत वक्री आहे आणि 4 नोव्हेंबर रोजी मार्गी होईल. 4 नोव्हेंबरपासून शनि पुन्हा सरळ फिरण्यास सुरुवात करेल. शनिदेव मार्गी होण्यापूर्वी काही काम करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.
शनिवारी रात्री भोजपत्रावर चंदनाने 'ॐ ह्वीं' मंत्र लिहून दररोज त्याची पूजा करावी. असे केल्याने ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते.
जर तुमचे काम वारंवार बिघडत असेल, तुम्हाला बहुतेक कामात अपयश येत असेल तर शनिवारी काळ्या कुत्र्याला आणि काळ्या गायीला भाकरी खायला द्या. याशिवाय काळ्या पक्ष्याला खायला द्यावे. असे केल्याने शनि ग्रहाची क्रूर वाईट नजर नाहीशी होते.
नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी दर शनिवारी मुंग्यांना पीठ किंवा माशांना धान्य खाऊ घाला. असे मानले जाते की, या उपायाचा अवलंब केल्यास नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होईल.
image 6
शनी आपली चाल बदलण्यापूर्वी 'या' गोष्टी अवश्य करा, शनिदेवाच्या कृपेने सुख-समृद्धी, धनलाभ होतो
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)