Health Tips: डायबिटीज असूनही गोड खावसं वाटतंय? तर 'हे' 6 पदार्थ ठरतील योग्य
डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेटमध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे गोड खाण्याची इच्छा कमी करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरताळे: रताळ्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे शरीरातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते आणि गोड खाण्याची तलफ देखील कमी होते.
ड्रायफ्रुट्स: हेल्दी फॅट्स आणि प्रथिनांनी समृद्ध ड्रायफ्रुट्स तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात आणि ते दररोज खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहाल आणि गोड खाण्याची इच्छा कमी होईल.
अवोकाडो: यात हेल्दी फॅट्स आणि फायबर्स आढळतात, जे डायबिटीज रुग्णांसाठी योग्य आहे.
बेरी: सर्व बेरीजमध्ये भरपूर फायबर आणि अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
पालक: व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने समृद्ध पालक मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. पालक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.