Spices Benefits: हिवाळ्यात गरम मसाल्याचे सेवन करणे ठरेल फायदेशीर; जाणून घ्या यामुळे होणारे फायदे
गरम मसाला खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? . हिवाळ्यात गरम मसाला कसा वापरावा? असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात गरम मसाला खाण्याचे अनेक फायदे आहेत. कारण गरम मसाल्यांमध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असतात. तसेच गरम मसाला शरीराच्या विविध अवयवांवर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो. यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी दोन्ही घटक असतात. ज्यामुळे अंगदुखी कमी होते.
धने,जिरे, हिरवी इलायची,मोठी इलायची,दालचिनी,लवंग,बडीशेप,चक्रफूल,जायफळ,जायफळाचे वाळलेले बाह्य आवरणही मसाले म्हणून वापरले जाते आणि तेजपत्ता या गोष्टी मिसळून तयार केला जातो गरम मसाला.
गरम मसाला हा एक प्रकारचा इम्युनिटी बूस्टर आहे. गरम मसाला अनेक आजारांपासून बचाव करण्याचे काम करते.
गरम मसाला खाल्ल्याने सर्दी, खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळते. श्लेष्मा वितळवण्यासाठी आणि कफच्या समस्येपासूनही मुक्त होण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
गरम मसाला शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्याचे काम करतो.
गरम मसाल्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर करतात.
गरम मसाला हाडे निरोगी ठेवण्याचे आणि सांधेदुखी बरे करण्याचे काम करते. त्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
गरम मसाला पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हा मसाला पोट निरोगी ठेवण्याबरोबरच चयापचय क्रियेला गती देतो.
टीप : हिवाळ्यात गरम मसाला खाल्ल्याने शरीर उबदार राहते.परंतु याचे अतिसेवन केल्यासही आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळे गरम मसाल्याचे सेवन किती प्रमाणात करावे याबाबतीत तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.