Curry Leaves : अनोशेपोटी कडीपत्त्याची पानं खाऊन पाहा, भन्नाट फायदे
Curry Leaves Benefits : पोषक तत्वांनी युक्त कढीपत्ता रोज खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात, याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकढीपत्त्याचा वापर घरांमध्ये जेवण चविष्ट बनवण्यासाठी केला जातो. कढीपत्त्याच्या पानांमुळे जेवण चविष्ट बनतेकढीपत्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. (Image Source : istock)
पौष्टिक कढीपत्ता एक उत्त ऊर्जा स्रोत आहे. यामध्ये जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ई तसेच लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात. (Image Source : istock)
कढीपत्त्यामध्ये आयर्न, फॅट, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. (Image Source : istock)
कढीपत्ता त्यांच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखला जातो. कढीपत्ता पारंपारिकपणे पचनास मदत करण्यासाठी वापरला जातो. यामुळे अपचन आणि मळमळ या समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. (Image Source : istock)
कढीपत्ता प्रभावाला थंड असतो ज्यामुळे पोट थंड होते आणि पचनाशी संबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. कढीपत्त्याच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. (Image Source : istock)
कढीपत्त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवरही संतुलित राखण्यातही फायदेशीर आहे. (Image Source : istock)
कढीपत्त्याचे नियमित सेवनाने ग्लुकोज चयापचय सुधारते, मधुमेह रुग्णांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे. (Image Source : istock)
कढीपत्ता केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे. कढीपत्ता केसांचे आरोग्य वाढवते आणि केस अकाली पांढरे होण्याची समस्या दूर करते. गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी कढीपत्ता खाऊ नये. (Image Source : istock)
दिवसातून 10-15 कढीपत्ता खाणं चांगलं आहे. तुम्ही कढीपत्त्याची पाने कच्ची खाऊ शकता किंवा पाण्यात उकळून चहाप्रमाणे किंवा रस काढून त्याचं सेवन करु शकता. (Image Source : istock)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image Source : istock)