Health Tips : थंडीच्या दिवसात 'गरम' की 'थंड' कोणत्या पाण्याने अंघोळ करावी?
उत्तर भारतात थंडीला सुरुवात झाली आहे. लोक थंडीच्या मोसमाची खूप वाट पाहतात, पण हा ऋतू जितका चांगला आहे तितकेच त्याचे दुष्परिणाम ही आहेत.(Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच हिवाळा हा ऋतू अनेक समस्या आणि आजारही घेऊन येतो. काही लोकांना या ऋतूत आंघोळ करायला आवडत नाही, म्हणून ते आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात.(Photo Credit : Unsplash)
जाणून घ्या की गरम पाण्याने आंघोळ करणे योग्य आहे का? आंघोळीसाठी गरम पाणी वापरणे योग्य नाही असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात.(Photo Credit : Unsplash)
तज्ञांच्या माहितीनुसार हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने सर्दी होत नाही तसेच त्यामुळे सर्दी आणि खोकलाही दूर राहतो. दुसरे म्हणजे, रक्त परिसंचरण देखील सुधारते.(Photo Credit : Unsplash)
आंघोळीसाठी कोमट पाणी चांगले आहे पण खूप गरम पाणी आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्वचेशी संबंधित समस्या असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने अंघोळ करा.(Photo Credit : Unsplash)
आरोग्य तज्ञांच्या मते, थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ते हिवाळ्यात थंड पाण्याने सहज आंघोळ करू शकतात.(Photo Credit : Unsplash)
एकंदरीत हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.(Photo Credit : Unsplash)
जे लोक रोज गरम पाण्याने अंघोळ करतात त्यांना दिवसभर प्रसन्न, ताजे टवटवीत असल्यासारखे वाटत नाही. त्यांना सतत आळस येऊ शकतात त्यामुळे दररोज गरम पाण्याने आंघोळ करू नये.(Photo Credit : Unsplash)
तुम्ही जर केस धुवत असला तर गरम पाणी वापरू नका. कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो आणि तुमचे केस कोरडे देखील होऊ शकतात.(Photo Credit : Unsplash)
गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते. तसेच त्वचा कोरडी होऊ लागते. तसेच त्वचेवरील मुरुम आणि खाज दिसू लागते. त्यामुळे शक्य तो कोमट पाण्यानेच अंघोळ करायला हवी. (Photo Credit : Unsplash)