Rohit Pawar : मनुबाई जवळा या बीड जिल्ह्यातील शेवटच्या गावात युवा संघर्ष यात्रेचा दुपारचा ब्रेक, रोहित पवार आणि सहकाऱ्यांनी मंदिरातच केला आराम
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात दाखल झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनुबाई जवळा या बीड जिल्ह्यातील शेवटच्या गावात युवा संघर्ष यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.
मनुबाई जवळा गावात युवा संघर्ष यात्रा गेली असता तेथे मारुती मंदिर दर्शन घेतले आणि गावातील नागरिकांच्या बरोबर संवाद साधला.
यावेळी आमदार संदीप शिरसागर तसेच रोहित आर आर पाटील, बबनदादा गीते, सुशिलाताई मोराळे यांच्यासोबत ग्रामस्थ, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर दमलेल्या रोहित पवारांनी दुपारी ब्रेक घेतला आणि मंदिरातच आराम केला.
रोहित पवार आणि त्यांचे साथीदार मंदिरात आराम करतानाचे फोटो व्हायरल होत आहेत.
तीन दिवसापासून रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा बीड जिल्ह्यात असून या यात्रेला तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय.
दुसरीकडे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या यात्रेमध्ये सहभागी होऊन केलेला डान्स देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.