Coffee Side Effects : कॉफी प्रेमींनो, ही बातमी वाचा! आरोग्यावर होईल वाईट परिणाम, वेळीच सावध व्हा
योग्य प्रमाणात कॉफीचं सेवन शरीरासाठी चांगलं आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट ठरतो. (PC : istockphoto)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॉफीचं अधिक सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होईल, त्यामुळे वेळी सावध होणं गरजेचं आहे. (PC : istockphoto)
जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढून अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळेल. त्यामुळे यावर वेळीच उपाय करणं गरजेचं आहे. (PC : istockphoto)
जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास त्यामुळे आरोग्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफीन (Caffine) असते. (PC : istockphoto)
कॉफीचं अधिक सेवन केल्यात शरीरात कोलेस्टेरॉल वाढते (Cholesterol Increased) आणि हे अनेक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरतं. (PC : istockphoto)
कॉफीमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची (Bad Cholesterol) पातळी वाढते हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झालं आहे. मात्र, तुम्ही किती कॉफी पितात यावर ते अवलंबून असतो. (PC : istockphoto)
विशेष म्हणजे कॉफीचा महिला आणि पुरुषांच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. एका संशोधनानुसार, कॉफीचं जास्त सेवन केल्यानं शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे कॉफीचं सेवन कमी प्रमाणात करावं. (PC : istockphoto)
रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील कोर्टिसोल हार्मोन (Cortisol Hormone) म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची (Stress Hormone) पातळी वाढते. यामुळे स्त्रियांच्या प्रजननाच्या क्षमतेवर (Ovulation), वजन (Weight) आणि हार्मोन्सवर (Hormonal Effects) वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. (PC : istockphoto)
शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी असते. त्यामुळे, जेव्हा तुम्ही सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन करता तेव्हा कोर्टिसोलची पातळी कमी होते. (PC : istockphoto)
कोर्टिसोल हार्मोन (Cortisol Hormone) म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची (Stress Hormone)आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे ते नियंत्रणात राहणं गरजेचं आहे. (PC : istockphoto)
ब्लॅक कॉफी ह्रदयासाठी लाभदायक असल्याचं अभ्यासातून समोर आले आहे. पण यासाठी कॉफीचे सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. (PC : istockphoto)
दररोज एक किंवा दोन कप ब्लॅक कॉफी प्यायल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही असतात, हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण कॉफीचा अतिरेक आरोग्यासाठी हानिकारक आहे. (PC : istockphoto)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (PC : istockphoto)