Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी काबुली चणे ठरू शकतो उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे..
वजन कमी करण्यासाठी डाएट चार्टमध्ये फक्त कंटाळवाण्या गोष्टी तुमच्या नशिबात येतात. परंतु तुम्हाला माहित आहे का की चणे खाऊनही तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचणे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात खूप मदत करू शकतात. अनेक पोषणतज्ञांनी चणे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे म्हटले आहे.
चणे स्नॅक म्हणून खाण्याचा सल्ला दिला जातो. चणे हा एक परिपूर्ण नाश्ता मानला जातो, जो काही मसाल्यांसोबत तुम्ही भाजून खाऊ शकता .
हिवाळ्यात संध्याकाळी खूप भूक लागते, अशा वेळी काबुली चणे खाणे वजन कमी करण्यासाठी योग्य ठरू शकते.
असे म्हटले जाते की एक कप चणे आपल्या दैनंदिन गरजेच्या 22% लोह, 40% फायबर आणि 70% फोलेट प्रदान करतात. चणे खाल्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही.
चण्यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.एका संशोधनात असे समोर आले आहे की चणे खाल्ल्याने वजन 25 टक्क्यांनी कमी होते.
चणे आणि चण्यापासून बनवलेले स्नॅक्स खाण्यासाठी काही विशेष वेळ निश्चित नाही, परंतु पोषणतज्ञांचा असा विश्वास आहे की संध्याकाळी भूक लागल्यावर जर तुम्ही त्याचा आहारात समावेश केला तर त्याचा खूप फायदा होईल. तथापि, तुम्ही ते सकाळी नाश्ता म्हणून आणि रात्रीच्या जेवणानंतर देखील खाऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)