Blood Cancer : सावधान! त्वचेचा बदललेला रंग असू शकतं ब्लड कॅन्सरचं लक्षण, वेळीच सावध व्हा
ब्लड कॅन्सर खूप धोकादायक आहे. ब्लड कॅन्सरला ल्युकेमिया असंही म्हणतात. ब्लड कॅन्सर बोन मॅरोमध्ये सुरू होतो आणि नंतर हळूहळू संसर्ग रक्तात पसरतो.(Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appब्लड कॅन्सरचं निदान लवकर झालं तर जीव वाचवणं शक्य होतं. पण याचं निदान जर शेवटच्या टप्प्यात झालं तर, मात्र जीव वाचवणं फार कठीण आहे.(Image Source : istock)
ब्लड कॅन्सर टाळण्यासाठी तुमची जीवनशैली सुधारावी लागेल आणि निरोगी आहाराचे पालन करावं लागेल. (Image Source : istock)
चांगली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे तुम्ही हा आजार टाळू शकता.(Image Source : istock)
ब्लड कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे त्वचेवर दिसतात. पण ही लक्षणे ओळखणे फार कठीण आहे. (Image Source : istock)
रक्ताच्या कर्करोगाचा लाल रक्तपेशींवर खूप परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींची निर्मिती थांबते. (Image Source : istock)
ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला रुग्णाच्या त्वचेवर अनेक लक्षणे दिसतात. ज्याकडे दुर्लक्ष करणं फार महाग पडू शकतं. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वेळेवर निदान आणि उपचार करणं खूप कठीण आहे.(Image Source : istock)
ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया झाल्यास रुग्णाच्या त्वचेचा रंग बदलू लागतो. त्यामुळे शरीराचा रंग पिवळा होऊ लागतो. एवढेच नाही तर डोळेही पिवळे पडू लागतात. (Image Source : istock)
जर तुम्हाला रक्ताच्या कर्करोगाची लागण झाली असेल तर, त्वचेवर छोटी दुखापत किंवा जरा कापलं तरीही जास्त रक्तस्त्राव होतो. ब्लड कॅन्सरमुळे ल्युकेमिया कटिस नावाचा आजार होतो.(Image Source : istock)
ब्लड कॅन्सर तपासण्यासाठी डॉक्टर सीबीसी चाचणी केली जाते. जेव्हा कर्करोगाच्या रुग्णाची बायोप्सी केली जाते. या तपासणीद्वारे कर्करोग ओळखता येतो. (Image Source : istock)