Health care : नवरात्रीत उपवास केल्यानं अॅसिडिटी होते? 'या' पदार्थांचे करा सेवन
नवरात्रीला अनेक जण नऊ दिवस उपवास करतात. या दिवसांमध्ये अॅसिडिटी आणि गॅस सारख्या समस्या अनेकांना जाणवतात. अॅसिडिटी आणि गॅस होऊ नये यासाठी या पदार्थांचे सेवन करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर उपवास करत असताना तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर एक ग्लास थंड दूध प्या.
थंड दूध प्यायल्यानं अॅसिडिटी होत नाही तसेच भूक देखील कमी लागते.
उपवासाच्या करत असताना दह्याचं सेवन करावं. यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होणार नाही. खिचडीसोबत तुम्ही दही खाऊ शकता.
खिचडीसोबत तुम्ही दही खाऊ शकता. तसेच दह्यासोबत साखर देखील तुम्ही खाऊ शकता.
उपवास करत असताना तुम्ही भगर (वरईचा भात) खाऊ शकता. यामुळे गॅसही होणार नाही आणि भूक देखील कमी लागेल.
उपवास करत पाणी कमी प्यायल्यानं अॅसिडिटी होते. त्यामुळे दिवसातून एक किंवा दोन वेळा नारळ पाणी प्या.
दुधी भोपळ्याची खीर तुम्ही उपवासाला खाऊ शकता. दुधी भोपळ्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानं अॅसिडीटी होत नाही.
उपवास करत असताना सकाळी रोज एक सरफचंद खा. त्यामुळे गॅस होत नाही आणि भूक कमी लागते.
उपवास करत असताना सफरचंद खाल्ल्यानं थकवा देखील जाणवणार नाही.