यामाहा Aerox 155 चा Moto GP Edition लॉन्च, मिळणार हे फीचर्स

Yamaha Aerox 155 MotoGP Edition

1/10
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा मोटर्सने आपल्या Aerox 155 चा Moto GP Edition भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. कंपनीच्या या नवीन स्कूटरची किंमत 1,41,300 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
2/10
कंपनीने ही स्कूटर 'द कॉल ऑफ द ब्लू' या ब्रँड मोहिमेअंतर्गत लॉन्च केली आहे. ही भारतातील सर्व प्रीमियम ब्लू स्क्वेअर आउटलेटवर उपलब्ध आहे. कंपनीने याआधीही याच लिव्हरी ट्रीटमेंटसह नवीन YZF-R15 लॉन्च केली होती.
3/10
या नवीन स्कूटरमध्ये कंपनीने एलईडी हेडलाइट आणि टेल लाइटसह एलईडी डीआरएल लाईट आणि टर्न इंडिकेटरही एलईडीमध्ये देण्यात आले आहेत.
4/10
Aerox 155 ला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस ऑपरेशन, चार्जिंग सॉकेट आणि सिंगल चॅनेल ABS सुरक्षितता आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम देखील मिळते. या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसारख्या अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे.
5/10
या स्कूटरच्या दोन्ही बाजूंना 14-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. या नवीन स्कूटरला ब्लूटूथद्वारे यामाहा वाय-कनेक्ट अॅप्लिकेशनशी कनेक्ट केले जाऊ शकते. हे अॅप्लिकेशन स्कूटरचे मायलेज, राइडिंग हिस्ट्री, पार्किंग लोकेशन, बॅटरी लेव्हल आणि मेंटेनन्स अॅलर्टसह विविध सूचना पुरवते. स्कूटरमध्ये 5.5-लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे आणि 25 लीटरची अंडरसिट स्टोरेज ग्राहकांना मिळेल.
6/10
Aerox 155 मध्ये नवीन जनरेशनचे 155cc ब्लू कोअर इंजिन देण्यात आले आहे. जे व्हेरिएबल वाल्व्ह अॅक्ट्युएशनने (VVA) सुसज्ज आहे. हे CVT ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.
7/10
हे इंजिन लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, SOHC, 4-व्हॉल्व्ह इंजिनद्वारे समर्थित आहे. जे 8,000 rpm वर 15 bhp ची पॉवर आणि 6,500 rpm वर 13.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
8/10
भारतात Aerox 155 ची स्पर्धा Aprilia SXR160 शी होईल. जरी या दोन्ही स्कूटर मॅक्सी-स्कूटर्सच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत, परंतु पॉवर आउटपुट आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत एरोक्स 155 एप्रिलिया एसएक्सआर160 पेक्षा चांगली आहे.
9/10
दरम्यान, अलीकडे यामाहाने R15M आणि Yamaha MT-15 V2.0 ला नवीन MotoGP लिव्हरी ट्रीटमेंट देखील दिली आहे. हे मॉडेल्स Aerox 155 सारख्या ब्लू स्क्वेअर आउटलेटवरून देखील खरेदी करता येतील.
10/10
जिथे Yamaha YZF-R15M किंमत 1,90,900 रुपये आहे (एक्स-शोरूम, दिल्ली). तसेच Yamaha MT-15 V2.0 ची किंमत 1,65,400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
Sponsored Links by Taboola