Health Tips : गरोदर महिलांनी हिवाळ्यात नारळ प्याव्ये का? तज्ज्ञांचे यावरील मत जाणून घ्या
हिवाळ्याच्या काळात गरोदर महिलांना त्यांच्या खाण्याच्या सवयींबाबत खूप काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत, एक प्रश्न अनेकदा उद्भवतो की, गर्भधारणेदरम्यान आणि हिवाळ्यात नारळ पाणी पिणे सुरक्षित आहे का? नारळाचे पाणी, जे त्याच्या पोषक आणि ताजेपणासाठी ओळखले जाते. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबहुतेकदा नारळ पाण्याला उन्हाळ्यात जास्त करून प्राधान्य दिले जाते. पण, हिवाळ्यात, विशेषतः गरोदरपणात हे पिणे तितकेच फायदेशीर ठरेल का? जाणून घेऊया तज्ज्ञांच्या यावर काय मत आहे. (Photo Credit : Pixabay)
नारळ पाणी हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असलेले नैसर्गिक, पोषणयुक्त पेय आहे. हे केवळ तुम्हाला हायड्रेटेड ठेवत नाही तर आरोग्याच्या अनेक उद्देशांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. तसेच गर्भधारणेदरम्यान, हे आणखी महत्त्वाचे पेय मानले जाते कारण ते केवळ आईचेच नव्हे तर गर्भातील बाळाचेही पोषण करण्यास मदत करते. (Photo Credit : Pixabay)
आरोग्य तज्ञांचे असे म्हणने आहे की, नारळाच्या पाण्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स, विशेषत: पोटॅशियम, गर्भधारणेदरम्यान थकवा आणि निर्जलीकरणापासून मुक्त होण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)
त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. याशिवाय नारळाचे पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे, जी गर्भधारणेदरम्यान एक सामान्य समस्या आहे. पण, हिवाळ्यात याचे सेवन करताना ते जास्त थंड न पिण्याची काळजी घ्यावी. (Photo Credit : Pixabay)
जर तुम्हाला नारळाचे पाणी प्यायचे असेल तर ते खोलीच्या तापमानात ठेवा आणि हिवाळ्यात ते खूप थंड पिऊ नका. तसेच जास्त प्रमाणात आणि रिकाम्या पोटी पिऊ नये. ही काळजी लक्षात घेऊन तुम्ही हिवाळ्यातही नारळ पाणी पिऊ शकता.(Photo Credit : Pixabay)
हिवाळ्यातही नारळ पाणी पिता येते पण त्याची योग्य वेळ आणि पद्धत अत्यंत महत्वाची असते. हिवाळ्यात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नारळाचे पाणी पिणे चांगले मानले जाते. (Photo Credit : Pixabay)
रात्रीच्या वेळी याचे सेवन करू नका कारण याचा थंड प्रभाव तुमच्या शरीरावर पडू शकतो. ज्यामुळे खोकला आणि सर्दी सारख्या समस्या वाढू शकतात. (Photo Credit : Pixabay)
नारळ पाणि पोटाला थंडावा देते म्हणून अनेक लोक नारळ पाण्याचे सेवन करतात. तसेत नारळाच्या पाण्यात लॉरिक अॅसिड आढळते जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात रिकाम्या पोटी याचे सेवन करणे देखील फायदेशीर मानले जाते. पण, तुम्ही हिवाळ्याच्या दुपारी ते पिऊ शकता.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)