Health Tips: अनेक आजारांवर मसाल्यातला 'हा' प्रकार ठरेल उपयुक्त; आयुर्वेदाप्रमाणेच आहेत गुणधर्म
काळे तीळ हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाची शक्यता कमी करण्यात मदत करू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाळे तीळ आणि तिळाच्या तेलाचा वापर ताण कमी करण्यासाठी केला जातो. यामध्ये उच्च अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, त्यामुळे ते ताणतणाव कमी करण्यास तसेच अल्झायमर रोग टाळण्यासही मदत करते.
काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे, मॅंगनीज, जस्त, लोह या पोषक तत्वांचा समावेश असतो. काळे तीळ रोग प्रतिकारशक्ती वाढवतात.
तिळामध्ये आढळणारे तेल आतडे गुळगुळीत म्हणजेच चिकट ठेवते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. बद्धकोष्ठता दूर करण्यात काळे तीळ उपयुक्त ठरतात.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काळे तिळ मदत करतात.
साबण, शॅम्पू आणि मॉइश्चरायझर यांसारख्या केस आणि त्वचेच्या उत्पादनांमध्ये तिळाचे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तिळामध्ये अनेक पोषक घटक असतात जे निरोगी केस आणि त्वचा राखण्यासाठी उपयुक्त असतात.
काळे तीळ हृदयविकाराचा धोका कमी करते.