Rain : 21 जिल्ह्यात समाधानकारक पाऊस तर 10 जिल्ह्यात पावसाची तूट
राज्यात पावसाची सरासरी (Average rainfall) घटली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. पावसाच एका टक्क्याची तूट पडली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे.
10 जिल्ह्यात पावसाची तूट असून, पाच जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
राज्यात अल निनोचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. सहा ऑगस्टपासून राज्यात मान्सूनने ब्रेक घेतला आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, सातारा, सांगली आणि परभणीसारख्या जिल्ह्यात पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे.
राज्यात कोकणात सरासरीच्या 118 टक्के पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 88 टक्के पाऊस झाला आहे.
मराठवाड्यात सरासरीच्या 92 टक्के पाऊस तर विदर्भात सरासरीच्या 94 टक्केच पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची मोठी तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील 21 जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. तर 10 जिल्ह्यात पावसाची तूट
पाच जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, राज्यात अल निनोचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे.