Best Time to Eat Ice Cream : थंडीत आईस्क्रीम खावं की नको? या प्रश्नाचं उत्तर येथे मिळेल...
आईस्क्रीम पाहिले की ते खाण्याची ईच्छा लहान असो किंवा मोठे सर्वांनाच होते.हिवाळ्यात अनेक जणांना प्रश्न पडतो की आईस्क्रीम थंड असते तर ते खावे की नाही.आईस्क्रीम बद्दल या गोष्टी तूम्ही जाणून घ्या आणि ठरवा ते योग्य की अयोग्य (Photo Credit : Pexels.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुध आणि मलई पासून आईसक्रीम तयार करण्यात येते त्यामूळे ते आरोग्यदायी मानले जाते.कार्बोहाइड्रेट ,फॅट आणि प्रोटीन असते आणि यापासून शरीराला ऊर्जा मिळते म्हणून ऊर्जा मिळविण्यासाठी थंडीत आईस्क्रीम योग्य आहे. (Photo Credit : Pexels.com)
थंडीत पाणी कमी पिले जाते त्यामूळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते,आईस्क्रीम खाल्याने शरीरास पाणी मिळते आणि पाण्याची कमतरता भासत नाही. (Photo Credit : Pexels.com)
आईस्क्रीम मधुन कॅल्शियम,व्हिटॅमिन डी मिळत असते त्यामूळे ते शरीरासाठी पोषक ठरते (Photo Credit : Pexels.com)
या दिवसात गरम पदार्थ तर खाल्ले जातात मात्र शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आईस्क्रीम खावे. (Photo Credit : Pexels.com)
तज्ञांच्या मते हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे योग्य आहे आणि सकाळी आईस्क्रीम खाणे आरोग्यासाठी पोषक ठरते.संध्याकाळी खाल्ल्यास सर्दी चा त्रास होऊ शकतो. (Photo Credit : Pexels.com)
आईस्क्रीम खाल्याने तणाव कमी होतो,मन शांत राहते आणि विचारांना स्थिरता मिळते त्यामूळे तणाव कमी करण्यासाठी आईस्क्रीम खाता येते. (Photo Credit : Pexels.com)
आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि इम्यूनिटी वाढविण्यासाठी चांगले असते म्हणून हिवाळ्यात आईस्क्रीम खाणे योग्य ठरते. (Photo Credit : Pexels.com)
घशा संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी आणि ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हिवाळ्यात आईस्क्रीम खावे. (Photo Credit : Pexels.com)
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pexels.com)