Yoga Day 2022 : फक्त सकाळीच नाही तर संध्याकाळीही योग करता येतो; मिळतात अनेक फायदे
सकाळी व्यायाम किंवा योगा केल्याने शरीराला फायदा होतोच असे नाही, पण हे योग तुम्ही संध्याकाळीही करू शकता. संध्याकाळी योगा केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळी केलेल्या योगाभ्यासाने तुमचे शरीर आणि मन तंदुरुस्त राहते, तर संध्याकाळी केल्याने मानसिक शांती मिळते आणि झोपही चांगली लागते. चला जाणून घेऊया संध्याकाळी योगा केल्याने कोणते फायदे होतात.
दिवसभराच्या थकव्यानंतर संध्याकाळी योगा केल्याने दिवसभराचा थकवा, तणाव आणि चिंता दूर होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप येते.
जर तुम्हाला दिवसभर एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर संध्याकाळी योगाद्वारे तुम्ही तो दूर करू शकता. यामुळे तुमचे मन शांत होईल आणि तुम्हाला तणावमुक्त वाटेल. तंदुरुस्त राहण्यासोबतच योगामुळे तणावही दूर होतो.
जर तुम्हालाही सकाळच्या वेळेत योगासने करता येत नसेल, तर टेन्शन घेऊ नका. सर्व कामं उरकून तुम्ही संध्याकाळी योग करू शकता. यावेळी तुमची धावपळ होणार नाही आणि तुम्ही तणावमुक्त होऊन आसनांमध्ये ध्यान करू शकता.