Health benefits of Kabuli Chana : काबुली चण्याचे पौष्टिक गुणधर्म, पाहा याचे बहुगुणी फायदे !
काबुली चणा जितका पौष्टिक आहे तितकाच तो खायलाही स्वादिष्ट आहे. त्यात प्रथिने आणि व्हिटॅमिन बी 6 चांगल्या प्रमाणात असतात. तसेच फोलेट, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांचा चांगला समावेश असतो. त्यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि फायबर देखील असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाबुली चण्यामध्ये प्रथिने आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. जे बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन यांसारख्या आतड्यांतील समस्यांपासून संरक्षण करते.
काबुली चणे शरीरात नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. हे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवून किडनीमध्ये उपस्थित विषारी पदार्थ साफ करते.
काबुली चण्यात असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
काबुली चण्यात प्रोटीन आणि आयरन मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळते. त्याचप्रमाणे काबुली चणे व्हिटॅमिन-ए, बी आणि ई देखील भरपूर प्रमाणात असतात, जे स्कॅल्प आणि केसांना निरोगी ठेवण्यासाठी काम करतात.
काबुली चण्याच्या सेवनाने तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बर्याच आजारांसोबतच हवामानातील बदलामुळे येणाऱ्या अनेक शारीरिक समस्यांपासूनही संरक्षण मिळते.
काबुली चण्यामध्ये कॉपर आणि मॅंगनीज आढळतात. जे सतत रक्तप्रवाहात मदत करतात. ते खाल्ल्याने शरीराचे तापमान योग्य राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.