Anjeer Benefits : अंजीर अनेक रोगांवरील औषध!
अंजीराची चव अद्वितीय आणि गोड दोन्ही आहे. त्यात मिळणारा क्रीमी पल्प चघळायला खूप चविष्ट लागतो. जे तुम्ही ताजे किंवा कोरडे खाऊ शकता. अंजीरमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. [Photo Credit : pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंजीर मध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी6, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज सारखे आवश्यक पोषक घटक असतात. यामध्ये फायबर आणि साखर मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते. [Photo Credit : pexel.com]
रक्तदाब नियंत्रण : अंजीर नियमित खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. अंजीरमध्ये आढळणारे फायबर आणि पोटॅशियम दोन्ही उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात. याशिवाय अंजीरमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित करतात. [Photo Credit : pexel.com]
हाडे मजबूत ठेवते: अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि या सर्व गोष्टी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक मानल्या जातात. कॅल्शियमने समृद्ध असलेले अंजीर हाडे मजबूत बनवण्यास मदत करतात, ज्यामुळे हाडे फ्रॅक्चरचा धोका कमी होतो. [Photo Credit : pexel.com]
दम्याच्या रुग्णाला आराम : अंजीर दम्यापासून बचाव करण्यासही मदत करते. अंजीर खाल्ल्याने शरीरातील श्लेष्मल त्वचेला आर्द्रता मिळते आणि कफ साफ होतो, ज्यामुळे दम्याच्या रुग्णाला आराम मिळतो. अंजीर फ्री रॅडिकल्सशी लढतात. जर मुक्त रॅडिकल्स शरीरात राहिले तर ते दमा अधिक तीव्र करू शकतात. [Photo Credit : pexel.com]
हृदयाचे रक्षण : शरीरात फ्री रॅडिकल्स तयार झाल्यामुळे हृदयातील धमन्या ब्लॉक होतात आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ लागतात. अशा स्थितीत अंजीरमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म हे फ्री रॅडिकल्स नष्ट करून हृदयाचे रक्षण करतात. याशिवाय अंजीरमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स असतात, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. [Photo Credit : pexel.com]
पचनसंस्था निरोगी राहते : अंजीरचे पाणी डिटॉक्स ड्रिंकचे काम करते. यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने मल जाण्याची प्रक्रिया सुलभ होते. याशिवाय हे पाणी आतड्यांचे आरोग्यही सुधारते. [Photo Credit : pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : pexel.com]