रागाचा पारा वाढून भीतीनं रडू येणाऱ्या कठीण भावनांवर कसं नियंत्रण मिळवायचं? थेरपिस्ट सांगतात हे मार्ग
आजकाल आपल्यापैकी अनेकजण अचानक रागाचा पारा चढणे, घाबरल्यासारखं होणं, धायमोकलून रडू येणं, तणाव, चिंता अशा अनेक समस्यांना तोंड देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदडपलेल्या भावना बाहेर न पडल्यानं अनेकांना डिप्रेशन येऊ लागतं. आतल्या भावना अचानक अनियंत्रित होतात.
या भावना कशा हाताळायच्या? चिंता, तणाव आल्यावर काय करायचं? यासाठी अनेक थेरपिस्टही यावर सोपे मार्ग सांगतात
चिंता हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सजग श्वासोच्छवासाचा सराव करणे आणि निसर्गात चालत शरीराला ग्राउंड करण्याचा प्रयत्न करणे.
जेव्हा दिवसाच्या मध्यभागी आपल्याला पॅनीकचा अटॅक येतो तेव्हा आपण स्वतःला शांत करण्यासाठी पोटातून श्वास घेण्याचा प्रयत्न करू शकतो.
सतत राग येत असेल तर मूड नियंत्रित करण्यासाठी स्वच्छ हवेत थोड्यावेळासाठी चाला. याशिवाय आठवड्यातून २-३ दिवस तरी व्यायाम करा
खूप निराशाजनक वाटत असल्यास गरम पाण्याने स्नान करण्याचा सल्लाही दिला जातो. तसेच पुरेशी झोप घेतल्यानंही ही समस्या दूर होते.