Amla Benefits: केस काळे करण्यासाठी आवळा फायदेशीर, जाणून घ्या फायदे
प्राचीन काळापासून लोक आवळ्याचे फायदे सांगतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआवळ्यामधील व्हिटॅमिन-सी, झिंक यांसारखे अनेक अँटीऑक्सिडंट असतात.
आजकाल बहुतेक लोकांना विशेषत: तरुणांना चुकीचा आहार, प्रदूषण, औषधांचा जास्त वापर आणि केसांची योग्य काळजी न घेणे यामुळे केस पांढरे होण्याची समस्या भेडसावत आहे.
आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी केस कमी वयात होणाऱ्या पांढऱ्या केसांसाठी फायदेशीर ठरु शकतात.
आवळा वातावरणातील हानिकारक घटकांचा केसांवर परिणाम होऊ देत नाही.
यासोबतच आवळ्यामध्ये अँटीबैक्टीरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म देखील असतात जे कोंड्याच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात.
केसांना आवळ्याचे पाणी लावल्याने केस लवकर काळे होण्यास मदत होते.
आवळा बारीक करून तुम्ही डब्यात ठेवू शकता किंवा त्याची पावडर बनवून देखील ठेवू शकता.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे कोलेजन वाढण्यास मदत होते.
केसांच्या मजबूत वाढीसाठी कोलेजन आवश्यक आहे आणि आवळा खाल्ल्यास त्याची वाढ होण्यास मदत होते. तसेच यामुळे केस मजबूत आणि लांब होण्यास देखील मदत होते.