Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahashivratri : हर हर महादेव! महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साह!
भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त या दिवशी शंकराची आणि शंकराच्या पिंडीची मनोभावे पूजा करून उपवास ठेवतात.( Image Credit- PTI )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाशिवरात्रीचे व्रत केल्याने महादेवाच्या आशीर्वादासोबत सुख-संपत्ती, धन लाभते असं म्हणतात.( Image Credit- PTI )
देशभरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. ( Image Credit- PTI )
कुणकेश्वर मंदिर परिसरात आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आलीय. कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर १०७ शिवलिंग आहेत. ओहोटीच्या वेळी ही शिवलिंग दृष्टीस पडतात. ( Image Credit- PTI )
महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलीय. पहाटे विधीवत पूजा करुन मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. ( Image Credit- PTI )
भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सर्व भाविकांना दर्शन मिळावे यासाठी उद्या रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर राहणार सुरु राहणार आहे.( Image Credit- PTI )
सर्वसामान्य भाविकांना सहज दर्शन मिळावं यासाठी तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. ( Image Credit- PTI )
महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील महादेवाची मंदिरं सजली मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकाल मंदिरात पहाटे महाकालला दुग्धाभिषेक, महाशिवरात्रीनिमित्त महाकालाची विधिवत पूजा करण्यात आली.( Image Credit- PTI )
महाशिवरात्रीचा उत्साह जेजुरीतील खंडेरायाच्या गडावरही महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. मंदिरातील तीन गुप्तलिंग वर्षातून फक्त महाशिवरात्रीलाचा खुली केली जातात. ( Image Credit- PTI )
त्यामुळे गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीये. तर खंडेरायाच्या मंदिराला आकर्षक रोषणाईही करण्यात आलीय. ( Image Credit- PTI )