Hair Grow Tips: लांब आणि घनदाट केस हवे? 'या' सोप्या टिप्स करा फॉलो
केसांना पोषण देण्यासाठी जास्वंद आणि कोरफडीचा बनवलेला हेअर पॅक लावा, यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळेल. हा हेअरपॅक 10 दिवसांतून एकदा केसांना लावा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआठवड्यातून एकदा दही, मेथी हेअर पॅक लावा किंवा तांदळाच्या पाण्याने केस धुवा. यामुळे तुमचे केस लांब आणि दाट होतील.
केसांच्या वाढीसाठी खाण्यावर लक्ष देणं देखील महत्त्वाचं आहे. केसांना प्रोटिन्स देण्यासाठी चांगला आहार घ्या.
केसांच्या पोषणासाठी आठवड्यातून किमान दोनदा नारळ पाणी आणि ज्यूस प्या. हे केसांसोबत त्वचेसाठीही फयदेशीर असते.
केसांच्या आरोग्यासाठी दररोज तुमच्या टाळूची मालिश करा, यामुळे केसांना पोषण मिळेल आणि केसांची वाढ देखील झपाट्याने होईल. सुट्टीच्या दिवशी तेलाने मालिश करा. सीरम आणि केमिकलयुक्त शाम्पू वापरणं टाळा.
केस धुवाल तेव्हा थोडा वेळ केस टॉवेलने बांधा आणि लगेच सोडून सुके करा. नेहमी केस सुकल्यानंतरच फणीने केस विंचरावे.