Hair Growth Tips : केसांच्या समस्येवर लसूण आहे गुणकारी, एकदा वापरून तर पाहा
केसासाठी बाजारात अनेक प्रोडक्टस उपलब्ध आहेत. पण या महागड्या आणि केमिकलयुक्त प्रोडक्टसपेक्षा तुम्ही घरगुती उपाय करुन ही समस्या दूर करु शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हीही या समस्येपासून त्रस्त असाल, तर यावर तुम्हाला सोपा आणि स्वस्त घरगुती उपाय जाणून घ्या.
केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्याचा सोपा घरगुती उपाय म्हणजे लसूण. प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात लसूण सहज उपलब्ध असते.
लसूण आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्याचप्रमाणे लसूण त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे.
लसणामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक पुरेशा प्रमाणात असतात. यामुळे केस लांब, जाड आणि मजबूत मदत होते.
केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लसूण हा सोपा आणि रामबाण उपाय आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.
लसणामध्ये सेलेनियम आणि सल्फर आढळते, हे केसांच्या मजबुतीसाठी फार आवश्यक असते. त्यामुळे केसांना लसणाचा रस लावल्याने केस मजबूत होतात.
केसांच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर केसांमध्ये लसणाचा रस वापरणे खूप उपयुक्त ठरु शकते.
लसणामधील पोषक घटक पुरेसे प्रमाणात असतात. हे घटक केस लांब, जाड आणि मजबूत होण्यासाठी फायदेशीर आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.