Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ghee Beauty Secrets : आरोग्यदायी तूप सौंदर्यासाठीही फायदेशीर, कसं ते जाणून घ्या...
तुम्ही थेट त्वचेवर तूप लावू शकता आणि याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही. तुम्ही तुपाचे फेस पॅकही बनवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुपातील खास गुणधर्मांमुळे त्वचा ग्लोईंग होईल. तुपातील व्हिटॅमिन ए, डी आणि ई तसेच अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
तुपामध्ये व्हिटॅमिन ए आणि फॅटी ऍसिड असतात, यामुळे ते उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हे त्वचेला दीर्घकाळ हायड्रेशन देते आणि कोरडे त्वचेची समस्या दूर करते.
आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर हळुवारपणे तूप लावून मसाज करू शकता, यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होईल.
डार्क सर्कलवर रोज तुप चोळल्यास तर त्वचेला चमक येऊन काळे डाग दूर होतील. याचा दररोज वापर केल्यास हळूहळू काळ्या डार्क सर्कलपासून सुटका होईल.
कोरड्या आणि फाटलेल्या ओठांच्या समस्येवर तूप खूप उपयुक्त ठरेल. मॉइश्चरायझिंग गुणधर्म असलेले तूप तुमच्या फाटलेल्या ओठांची समस्या दूर करेल. तूप लावल्याने ओठ मऊ होतात.
तुपातील काही गुणधर्म असतात त्वचेची लवचिकता सुधारतात, यामुळे त्वचा ग्लोईंग होईल. तुपातील व्हिटॅमिन ए, डी आणि ई तसेच अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
तूप आणि हळदीचा फेस पॅक त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. एक चमचे हळदीमध्ये 2 चमचे तूप मिसळून पेस्ट बनवा. हे चेहऱ्यावर लावून 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.