Margashirsh Purnima 2024 : मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी 'हे' उपाय करा; देवी लक्ष्मी होईल प्रसन्न, मनातील इच्छा होतील पूर्ण
या दिवशी सकाळी स्नान करुन सर्वात आधी पिंपळाच्या झाडाला दूध किंवा जल अर्पण करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर देवी लक्ष्मीचं ध्यान करुन पिंपळाच्या झाडावर तुपाचा दिवा लावावा. देवी लक्ष्मीचं ध्यान करावं. मान्यतेनुसार, या दिवशी उपाय केल्याने जीवनात सुख, शांती आणि सौभाग्य टिकून राहते.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी स्नान करा. तसेच, श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करा. असं म्हणतात की यामुळे 32 पट पुण्य मिळतं.
या दिवशी दूध, दही, तूप, साखर आणि तांदळाचं दान करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात संध्याकाळच्या वेळी घराच्या ईशान्य दिशेला दिवा लावा. यामुळे धनलक्ष्मी आकर्षित होते.
जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर प्रेम टिकवून ठेवायचं असेल तर पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्यानंतर देवाला चंदनाचा टिळा लावा. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला लाल रंगाची ओढणी चढवा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)