Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागल्याने त्याला दुखापत झाली आहे. स्वत:च्याच पिस्तुलातून त्याने चुकून गोळी झाडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरवानाधारक रिव्हॉल्व्हर साफ करताना चुकून त्याच्या गुडघ्यात गोळी लागली. त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली आहे.
गोळी लागल्याने गोविंदाच्या पायातून खूप रक्त वाहत होतं, त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती.
ही घटना मंगळवारी पहाटे 4:45 च्या सुमारास घडली. गोविंदा सध्या आयसीयूमध्ये आहे, आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.
गोविंदाच्या पायातली गोळी काढण्यात आली आहे. सध्या ते अंधेरीच्या क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
या घटनेबाबत रुग्णालयाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. गोविंदाच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, ते लवकरच या संदर्भात निवेदन जारी करतील.
गोविंदा कोलकाता येथे एका कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीत होते, असं त्यांचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितलं.
गोविंदाची मुंबईवरुन सकाळी 6 वाजताची फ्लाईट होती. पिस्तूल कपाटात ठेवत असतानाच मिसफायर झालं आणि त्यांच्या गुडघ्याखाली गोळी लागली.
गोळी लागल्यानंतर गोविंदाला तातडीने अंधेरीच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि गोळी बाहेर काढण्यात आली आहे.
डॉक्टरांनी आता गोविंदाच्या पायातली गोळी काढली असून त्यांची प्रकृती ठीक आहे. ते अजूनही रुग्णालयातच आहे.