Fruits Eat Benefits : फळं कापल्यानंतर किती वेळात खावीत? जाणून घ्या
प्रत्येकाला फळे खायला आवडतात. निरोगी शरीरासाठी डॉक्टर नेहमी फ्रेश फळं खाण्याचा सल्ला देतात. शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचं कामही फळं करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच, फळांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स असतात. फळं खाल्ल्याने तुम्हाला काही काळ भूकही लागत नाही. त्यामुळे फळं खाणं चांगलं. पण, जोपर्यंत तुम्हाला ते खाण्याची योग्य पद्धत माहीत नाही, तोपर्यंत ते तुमच्या शरीराला फायदा देऊ शकत नाहीत.
म्हणूनच कोणतेही फळ खाण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमुळे बरेच लोक फळे तोडून टिफिनमध्ये पॅक करतात आणि खूप दिवसांनी खातात. पण ही पद्धत योग्य आहे का?
फळे कापल्यानंतर लगेच खावीत. फळ कापल्यानंतर काही तासांनंतर तुम्ही त्याचे सेवन करत असाल तर त्यातील पोषकतत्त्वे कमी होऊ शकतात. तसेच, जितके फळ ताबडतोब खाल्ल्याने फायदा होतो, ते कापल्यानंतर काही तासांनंतर खाल्ल्याने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकत नाही.
फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. पण ते जास्त काळ कापून ठेवल्यास त्यातून मिळणारे पोषक आणि फायदे कमी होऊ शकतात. फळे कापून उघड्यावर जास्त वेळ ठेवल्याने त्यातील ‘क’ जीवनसत्त्व कमी होऊ शकते.
जर तुम्ही फळे कापून सकाळी ब्रेकफास्टसाठी ऑफिसमध्ये घेऊन जात असाल आणि ते आनंदाने खाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
कापलेली फळे टिफिनमध्ये ठेवल्यानंतर खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. तसेच, कापलेल्या फळांमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच, ते खाल्ल्याने तुमच्या पोटात सूज किंवा जळजळ होऊ शकते.
यासोबतच फळे जास्त वेळ कापून खाल्ल्याने फूड पॉयझनिंगची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच फळे कापल्यानंतर लगेच खाण्याचा प्रयत्न करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.