सांगलीमध्ये घडवली 35 किलो वजनाची सोनपितळेची पालखी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Feb 2023 04:27 PM (IST)
1
मिरज तालुक्यातील एरंडोली येथील जान्हवीदेवीची यंदाच्या यात्रेतील नगरप्रदक्षिणा आणखी दिमाखदार होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
गावकऱ्यांनी देवीच्या प्रवासासाठी 35 किलो वजनाची सोनपितळी पालखी बनवून घेतली आहे.
3
सोने-चांदीचा अंश समाविष्ट असलेली पालखी नुकतीच एरंडोलीला रवाना करण्यात आली.
4
सांगलीतील दिलीप आणि चेतन ओतारी पितापुत्रांनी सोनपितळेची 35 किलोंची पालखी तयार केली.
5
जान्हवीदेवीसाठी लाकडी पालखी वापरात होती.
6
एका भक्ताने नवसात सोनपालखी बोलताना सव्वा लाख देऊ केले होते.
7
त्या पैशातून पालखी साकारली असून तिला सिंहाचे पाय बसवण्यात आले आहेत.
8
वरील बाजूस भोवरे तसेच कड्या आहेत.
9
पालखी दोघांना वाहून नेता येण्यासाठी कमीतकमी वजनाची असेल, याकडे लक्ष देण्यात आले आहे.
10
ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून देवीचा गाभाराही सजविला आहे.