Leftover Chicken Pizza: उरलेल्या चिकनपासून बनवा पिझ्झा हटसारखा पिझ्झा, एकदम आवडीने खातील मुलं
उरलेला चिकनचा रस्सा पुन्हा कसा वापरायचा याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज तुम्हाला पिझ्झा रेसिपीसह उरलेल्या बटर चिकनला देसी इटालियन ट्विस्ट कसे देता येईल हे समजेल. नावाप्रमाणेच, हा सोपा आणि स्वादिष्ट पिझ्झा उरलेले बटर चिकनचे तुकडे आणि जाड करी घालून बनवला जातो. मोझरेला चीज, मीठ, मिरी, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून पिझ्झा बनवता येतो. ही साधी पिझ्झा रेसिपी संध्याकाळच्या स्नॅकसाठी तुम्ही बनवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सोप्या रेसिपीची सुरुवात करण्यासाठी, तुम्हाला सुमारे 1 कप/वाटी उरलेले बटर चिकन आणि 1 मध्यम ते मोठ्या पिझ्झा बेसची आवश्यकता असेल. प्रथम पिझ्झा बेस घ्या आणि पिझ्झा सॉस पसरवा, विविध भाज्यांसोबत थोडे किसलेले चीज घाला.
चिकनच्या जाड ग्रेव्हीसह बोनलेस बटर चिकनचा छान थर लावा आणि त्यावर मोझरेला चीज घाला.
यानंतर कोथिंबीर, मीठ, मिरपूड, ओरिगॅनो, चिली फ्लेक्स घालून पिझ्झा ओव्हन किंवा नॉन-स्टिक पॅनमध्ये 15-50 मिनिटे बेक करा. यानंतर, ओव्हनमधून पिझ्झा बाहेर काढा आणि त्याचे तुकडे करा आणि फ्रेश सर्व्ह करा.