Prarthana Behere : प्रार्थना बेहरें शेअर केले स्विमसूटमधील फोटो; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) ही सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो शेअर करत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच प्रार्थनानं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमधील तिच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
प्रार्थनानं ब्लू आणि व्हाईट कलरचा स्विमसूट आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो शेअर केले.
फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'Happiness looks like this!'
प्रार्थनाच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करुन तिला ट्रोल केलं.
प्रार्थनानं शेअर केलेल्या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'साऊथ इंडियन कलाकारांकडून शिका, ते कसे आपल्या संस्कृतीला प्रमोट करतात. प्रार्थना ताई तुमचे असे फोटो आम्हाला नाही आवडले.'
दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तुम्ही मराठी कलाकार आहात याचं भान ठेवावं. तुमच्या मालिका खूप गृहिणी फार आवडीने पाहतात. जर त्या गृहिणी असं पाहिलं तर तुमचा शो फ्लॉप पण होऊ शकतो.'
प्रार्थनाच्या एका चाहत्यानं तिच्या फोटोला एक कमेंट करुन ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. प्रार्थनाच्या चाहत्यानं कमेंट केली, 'काही पुरुष मंडळी तिला संस्कृती जपण्यास सांगत आहेत जसा काय तिने एकटीने ठेकाच घेतलाय. स्विमिंग कॉस्च्युम घालून स्विमींग नाही करणार तर काय साडी घालून करणार काय.'