Fashion Tips : हिवाळ्यातही सेलिब्रिटींप्रमाणे स्वत:ला ठेवा स्टायलिश, 'हे' ट्रेंड फॉलो करा
हिवाळ्यातही स्टायलिश दिसण्यासोबतच स्वत:ला थंडीपासून वाचवणंही गरजेचं आहे. पण स्टायलिश कसं दिसायचं हा प्रश्न अनेकांसमोर असतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंडीमध्ये स्टायलिश दिसायला हवं आणि त्यामधून आपल्याला थंडीही वाजायला नको, असे कपडे कपडे सिलेक्ट करताना चांगलीच पंचाईत होते. अशावेळी तुम्ही सेलिब्रिटींची स्टाईल फॉलो करू शकता.
तुम्ही हुडी कॅरी करू शकता. हुडी तुम्हाला स्टायलिश लूक देईल. तुम्ही स्कीनी जीन्स किंवा बॉयफ्रेंड जीन्स सोबत हुडी घालू शकता.
ऑफिस वेअरसाठी हिवाळ्यात ओव्हरकोट सर्वात सोयीस्कर पर्याय आहे. स्टायलिश असण्यासोबतच ओव्हरकोट थंडीतही तुमचं संरक्षण करतं. कुर्ती, साडी, जीन्स किंवा टी-शर्टसोबतही तुम्ही ओव्हरकोट कॅरी करू शकता.
ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही लेदर जॅकेट निवडू शकता. स्कीनी जीन्स आणि बूटसोबत लेदर जॅकेट हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्याचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे डेनिम जॅकेट. तुम्ही याला सूट कुर्ती, टी-शर्ट किंवा कोणत्याही ड्रेससोबत पेअर करू शकता.
तुम्ही पफर जॅकेटचाही पर्याय वापरू शकता. तुम्हाला पफर जॅकेट आणि बूट यामुळे खूप छान आणि स्टायलिश लूक मिळेल. यासोबत तुम्ही मफलरही घेऊ शकता.
हिवाळ्यात साधा पण तितकाच स्टायलिश लूक मिळवण्यासाठी तुम्ही लोकरीचे कार्डिगन्स किंवा स्वेटशर्ट देखील घालू शकता. कम्फर्टेबल असण्यासोबतच यामुळे तुम्हाला एक युनिक लूक मिळेल.
यंदा हिवाळ्यात या स्टाईल फॉलो करून पाहा. यामुळे तुम्ही स्टायलिशही दिसाल आणि थंडीपासूनही तुमचं संरक्षण होईल.