Fashion Tips For Rainy Season : पावसाळ्यातही करा हटके फॅशन , 'हे' कपडे बनवतील तुमचा लुक परफेक्ट
पावसाळ्यात शक्यतो काॅटनचे ड्रेस घाला. या प्रकारचे ड्रेस कॅरी करणे अत्यंत सोपे असते. तसेच ते ओले जरी झाले तरी ते लवकर वाळतात. जर तुम्ही पार्टीत जात असाल तर कॉटन साड्या हा एक अप्रतिम पर्याय असू शकतो. पुरुषांसाठी, कॉटनचे बरमोडा आणि शर्ट हा चांगला पर्याय ठरू शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक ऋतूत वेगवेगळी फॅशन फाॅलो केली जाते. या पावसाळ्यात तुम्ही शाॅर्ट स्कर्ट्स , लाँग स्कर्ट्स तसेच प्लाजो तुम्ही घालू शकता. यावर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा क्राॅप टाॅप तुमच्या लुकला क्लसी बनवू शकतो.
तुम्हाला पावसाळ्यात चांगला लुक हवा असेल तर हा स्कार्फ तुम्हाला तुमचा आवडता लुक देऊ शकतो. पावसापासून तुमच्या केसांचे रक्षण करण्याकरता देखील तुम्हाला स्कार्फचा फायदा होऊ शकतो. आॅफिसकरीता तुम्ही कॅज्युअल वनपीसवर एखादा प्रिंटेड स्कार्फ कॅरी करू शकता.
पावसाळ्यात फॅशनेबल दिसण्याकरता जम्पसूट हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आॅफिसकरता किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बाहेर जाताना तुम्ही जम्पसूट घालू शकता. लुक परफेक्ट दिसण्याकरता त्याखाली तुम्ही शूज किंवा हिल्स घालू शकता.
पावसाळ्यात, कोणत्याही प्रकारचे डाग पडू नयेत म्हणून गडद शेड्स वापरणे चांगले. यात पिवळा , निळा , गुलाबी , नारंगी हे रंग तुम्हाला चांगला लुक देऊ शकतात.